Breaking News

कोरोना से डरो ना; म्हसळा नगरपंचायतीचा पुढाकार

म्हसळा : प्रतिनिधी

कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. रुग्णाचा हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशातच लोकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. खबरदारीचे कोणकोणते उपाय व प्रतिबंधात्मक कारवाई कोरोनापासून वाचण्यासाठी करायला पाहिजे, याचे सध्या तर्कवितर्क लढवले जात असतानाच म्हसळ्याच्या नगराध्यक्षा जयश्री कापरे यांनी सोमवारी (दि. 16) विशेष सभेचे आयोजन केले आहे. तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक व शहरातील सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना या बैठकीचे खास निमंत्रण देण्यात आले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply