Breaking News

पनवेलमधील समस्यांची सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये ठिकठिकाणी असलेल्या गटारांमध्ये पाणी साचण्याची समसम्या नागरिकांना भेटसावत होती. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या समस्यांची मंगळवारी (दि. 22) पाहणी करून अधिकार्‍यांना आश्वयक त्या सूचना दिल्या तसेच दांडेकर हॉस्पीटल समोर उभारण्यात येत असलेल्या शाळेच्या कामाची पाहणी केली.

पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून नागरिकांना भेडसवणार्‍या समस्या जाणून त्या सोडवण्याचे काम करत आहेत. त्यानुसार प्रभाग क्रमांक 19 मधील एस.टी.स्टँड, उरण नाका, मिडल क्लास हौसिंग सोसायटी मधील गटारे तुंबण्याची समस्या नागरिकांना भेडसावत होती. त्या पार्श्वभुमीवर सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या गटारांची पाहणी करुन अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या तसेच दांडेकर हॉस्पिटल समोर महापालिकेमार्फत कन्या शाळा, सरस्वती विद्या मंदीर, दगडी शाळा या एकत्रितपणे उभारण्यात येत आहे. या शाळेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाची पाहणीही केली.

या वेळी प्रभाग समिती ‘ड‘च्या सभापती अ‍ॅड. वृषाली वाघमारे, नगरसेवक अनिल भगत, नगरसेविका रुचिता लोंढे, भाजप नेते अ‍ॅड. जितेंद्र वाघमारे, शहर अभियंता संदीप कटेकर, श्री. साळुंखे, आरोग्य विभागाचे संजय जाधव, यतिन देशमुख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply