Breaking News

आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते  विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन

पेण : प्रतिनिधी

तालुक्यातील वाशी नाका ते वाशी या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन वाशी येथे जगदंबा देवी मंदिराच्या प्रांगणात आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पेण तालुक्यातील वाशी विभागात अत्यंत गजबजलेला  वाशीनाका ते वाशी हा रस्ता अत्यंत खराब झाला होता. सरपंच गोरखनाथ पाटील श्रीकांत पाटील यांनी या रस्त्यासाठी सतत पाठपुरावा केल्याने या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी आमदार रविशेठ पाटील यांच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यात आली आहे. या भूमिपूजनाच्या समारंभासाठी अभियंता डी. एम.  पाटील, राजू पिचिका, भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, माजी उपसभापती व्ही. बी. पाटील, वाशी सरपंच गोरखनाथ पाटील, वढाव सरपंच पूजा पाटील, अनंत पाटील, शशिकांत मढवी, रमेश पाटील, अशोक पाटील, धर्माजी पाटील, मंगलदास ठाकूर, पद्माकर पाटील, मनोज पाटील, परशुराम पाटील, अशोक थवई, छावा संघटनेचे अनेक कार्यकर्ते व भाजप पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी वढाव येथील अंतर्गत रस्ते व आमदार निधीतून वढाव अंतर्गत गटार बांधकामाचे भूमिपूजन  करण्यात आले. त्याचप्रमाणे लाखोले ते घोडबंदर या रस्त्याचे उद्घाटनदेखील करण्यात आले. अत्यंत खराब झालेल्या वाशी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने वाशी विभागातील जनतेच्या वतीने आमदार रविशेठ पाटील यांचे आभार मानण्यात आले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply