अलिबाग : प्रतिनिधी
पुणे येथे झालेल्या ओपन बुद्धिबळ स्पर्धेत अलिबागमधील आरसीएफ शाळेतील 15 वर्षीय विद्यार्थी साई दीपक बलकवडे याने द्वितीय क्रमांक पटकाविला. या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते साईचा सत्कार केला.
या वेळी सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव, शिक्षण विभाग जिल्हा समन्वयक संदीप वारगे उपस्थित होते.
पुणे येथे झालेल्या स्पर्धेत नऊ राज्यांतील 461 स्पर्धकांसह परदेशातील काही स्पर्धक सहभागी झाले होते. साईने पहिल्या सात फेर्यांमध्ये विजय मिळवित सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आठव्या फेरीत त्याला पराभव सहन करावा लागला, तर नववी फेरी बरोबरीत सुटली. एकूण नऊ फेर्यांमध्ये त्याने 7.5 गुणांसह दुसरा
क्रमांक पटकाविला.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …