Breaking News

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
तळोजा फेज 1मधील आयशा हॉटेलने जागेची मर्यादा ओलांडत अनधिकृत बांधकाम केले आहे. या अनधिकृत बांधकामामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे केली आहे. त्या संदर्भात त्यांनी निवेदनही आयुक्तांना दिले आहे.
पनवेल महापालिका हद्दीतील तळोजा फेज 1मधील सेक्टर 2मध्ये असलेल्या आकार रेसिडेन्सीत आयशा नावाने हॉटेल व्यवसाय सुरू आहे. या हॉटेल मालकाने अनधिकृत बांधकाम करून बाहेरील जागेत किचन तसेच फुटपाथवरसुद्धा अनधिकृत काम केले आहे. त्याचबरोबर अवैधपणे स्वच्छतागृह उभारले आहे. येथे नावाला हॉटेल व्यवसाय दाखवला जात असून या जागेचा वापर मदरसा म्हणून करत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत आणि त्याच अनुषगांने अनधिकृत बांधकाम संदर्भातील फोटो तसेच व्हिडीओसुद्धा उपलब्ध झाले आहेत. या संदर्भात तक्रारी करणार्‍यांना हॉटेल मालकाकडून धमकावण्याचा प्रकारदेखील होत आहे. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करून तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिकेकडे केली आहे.
पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 3च्या कार्यक्षेत्रात येणार्‍या या आयशा हॉटेलच्या ठिकाणी विटांचे बांधकाम व पत्र्याचे शेड असे जवळपास 2088 चौरस फूट सर्रासपणे अनधिकृत बांधकाम केल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या हॉटेलच्या आडून मदरसा चालत असल्याचा धक्कादायक प्रकार व्हिडीओतून समोर आला आहे. हॉटेलचा चेहरा समोर करत मागील बाजूने मदरशासारखे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. त्यामुळे याबाबत कडक कारवाईची मागणी नागरिकांकडूनही होत आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply