मुंबई ः रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयी झालेले आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात जगातील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा असलेल्या संस्कृतमधून आमदारपदाची शपथ घेतली.
विधीमंडळाचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आले असून शनिवारी (दि. 7) पहिल्या दिवशी विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीला सुरुवात झाली. या वेळी विधानभवनात विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह विधानसभेचे सदस्य उपस्थित होते. भाजपच्या काही आमदारांनी संस्कृतमधून शपथ घेतली, तर काहींनी जय श्रीरामचे नारे दिले.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …