Breaking News

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे

पनवेल : रामप्रहर वृत्त
ज्या ज्या वेळी समाजात अन्याय होतो त्या वेळी सर्वांनी एकत्रित येऊन त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी (दि. 09) केले. अनुसूचित जातीच्या मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी आरपीआयचे पनवेल महानगर जिल्हा क्षेत्राचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारपासून आमरण उपोषण सुरू होते. पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केल्याने हे उपोषण लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत सोमवारी मागे घेण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
एका अनुसूचित जातीच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणार्‍या आरोपींविरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊनही त्यांना अद्याप अटक झाली नव्हती. त्यामुळे आरोपींना अटक करण्याची मागणी करत आरपीआयचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या उपस्थितीत आणि पनवेल महानगर जिल्हा क्षेत्राचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू होते. आरोपी शुभम पवार याने अनुसूचित जातीच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचा वारंवार गैरफायदा घेत युवतीची फसवणूक केली होती. यासाठी त्याला वडील कृष्णा पवार आणि आई अर्चना पवार यांनीही मदत केली. या प्रकरणी या तीनही आरोपींविरुद्ध खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरीदेखील या आरोपींना अटक करण्यात आली नव्हती. याच्या निषेर्धार्थ तसेच तरुणीला न्याय मिळवून देत आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पनवेल तालुका पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरू होते. या उपोषणाला रविवारी आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन पाठिंबा दिला होता.
दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शुभम पवार याला पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नारळ पाणी पिऊन उपोषण सोडण्यात आले. या वेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस प्रल्हाद केणी, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, प्रभाकर कांबळे, दिनेश जाधव, सुरेंद्र सोरटे, मिलिंद कांबळे, प्रकाश कांबळे, नलिनी भाटकर, शारदा शिरोळे, सुशिला इंगळे, मल्हारी घाटविसावे, भारती कांबळे, चंद्रसेन कांबळे, अनिता साळवे, प्रशांत कांबळे, अनिल रोकडे, भास्कर ढोबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

Check in today and rehearse the fresh BetMGM Missouri added bonus password

BetMGM Missouri Extra Code WSNSPORTS Countries $1,500 for Gonzaga against Kentucky BetMGM Missouri promotion code …

Leave a Reply