Breaking News

फुंडे हायस्कूलमध्ये वाहतूक विभागातर्फे विविध स्पर्धा

उरण : प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील फुंडे येथील तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुवारी (दि. 4) नवी मुंबई पोलीस आयुक्तालय वाहतूक विभागाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण भारतात देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. शासनामार्फत शासकीय कार्यालयात शाळांमध्ये विविध उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. वाहतूक विभागामार्फतही स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. भारताच्या भावी पिढीला वाहतुकीचे नियम कळावेत, त्यांचे महत्त्व समजावे आणि पुढील धोका अर्थात अपघाताचे वाढते प्रमाण कमी होण्यासाठी या पिढीकडून जनजागृती व्हावी या अनुषंगाने देशातील प्रत्येक शाळेत वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शेवा पोलीस स्टेशनचे पीएसआय धीरज चौधरी आणि त्यांच्या टीमच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फुंडे हायस्कुलचे आरएसपी शिक्षक दिगंबर पाटील आणि अस्मिता पाटील यांनी या स्पर्धांचे नियोजन करून स्पर्धा यशस्वी केल्या. वक्तृत्व स्पर्धेत 25 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि या स्पर्धेचे परीक्षण के. जी. म्हात्रे आणि जे. ए. देवरे यांनी केले. चित्रकला स्पर्धेत मुलांचा अधिक उत्साह पहावयास मिळाला. 150 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ही स्पर्धा श्री दिगंबर पाटील आणि साधना म्हात्रे यांनी सुरेखारीत्या पार पाडली. या दोन्ही स्पर्धा विद्यालयाचे चेअरमन कृष्णा कडू, प्राचार्या सुनीता वर्तक, पर्यवेक्षक श्री. गोडगे, एस. जी. म्हात्रे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे झाल्या.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply