Breaking News

पनवेलच्या महाळुंगीतील शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पनवेल तालुक्यातील खानाव ग्रामपंचायत हद्दीमधील महाळुंगी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. 14) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकापला जोरदार धक्का बसला आहे.
या वेळी शेकापचे लक्ष्मण नारायण भागिवंत, गणेश सुरेश भागिवंत, प्रतिक नथुराम बेडेकर, दर्शन रमेश पवार, शुभम विलास भागिवंत, जय भगवान तवले यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस भूपेंद्र पाटील यांनी पक्षात स्वागत केले.
या कार्यक्रमास खानाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच शशिकांत दिसले, रवि पाटील, एकनाथ फराड, योगेश पाटील, रघुनाथ पाटील, गणेश तातरे, शिवाजी कर्णूक, अनंता पाटील, प्रशांत बोलाडे, मनीष घागस, निलेश वारदे, निकेश घागस, उमेश वारदे, जयेश पाटील, सचिन दिसले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply