पनवेल : रामप्रहर वृत्त
68वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा शनिवारी (दि.12) साजरा झाला. यानिमित्त पनवेल शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेकडर भवनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशन आयोजित तसेच भारतीय बौद्ध महासभा बौद्धजन पंचायत समिती, बौद्धधम्म प्रचार प्रसार समिती, त्रिरत्न बौद्ध महासंघ, यांच्या संयुक्त विद्यमाने 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन धम्मचक्रप्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच आपल्या वाटचालीमध्ये आपण जी काही काम करण्याची संधी माझ्यावर सोपवाल ती पार पाडेल, अशी ग्वाही दिली. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश बिनेदार, भारतीय बौद्ध महासभेचे रायगड जिल्हाध्यक्ष काशिनाथ कांबळे, उरण तालुका अध्यक्ष कल्पेश कांबळे, बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष विजय गायकवाड, अम्मचारी कमलशुद्धी, मच्छिंद्र कांबळे, अनिल जाधव, सुनिल वाघपंजे, अजय जाधव, सि.के.बाबरे, राहूल गायकवाड, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, खांदा कॉलनीमधील बौद्धविहारामध्येही हा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमालाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, मनोहर म्हात्रे, अॅड. प्रकाश बिनेदार, दिपक मोरे, काशिनाथ कांबळे, राहुल पारगावकर, भिमराव पोवार, मोतीलाल कोळी, चंद्रसेन कांबळे, कविता वाघ, सुरेखा वाघमारे, महेंद्र कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …