कर्जत : प्रतिनिधी
तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कर्जत तालुका आदिवासी बहुल असून त्यांची परिस्थिती हालाकीची आहे ते खासगी रुग्णालयात उपचार घेऊ शकत नाहीत. मध्यमवर्गीय माणूससुद्धा कोरोना उपचाराचा खर्च करू शकत नाही. या बाबींचा विचार करून कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे कोकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे यांनीकेली आहे.
कर्जत उपजिल्हा रुग्णालयात चार व्हेंटिलेटर आहेत, मात्र त्यासाठी लागणारे तज्ज्ञ डॉक्टर म्हणजे एमडी मेडिसिन आणि भूलतज्ज्ञ नाहीत, त्यांचीसुद्धा उपलब्धता करून द्यावी, अशी मागणी सुनील गोगटे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने आणि उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
भाजपचे सुनील गोगटे यांच्या मागणीचा नक्कीच विचार करू, असे आश्वासन डॉ. सुहास माने आणि डॉ. मनोज बनसोडे यांनी दिले.