पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच करते आहे. खांदा कॉलनीतील माता रमाबाई आंबेडकर सांस्कृतिक भवन, खारघरमधील सामाजिक सभागृहामुळे सर्वसामान्य नागरिकांना विविध कार्यक्रम थाटामाटात साजरे करता येणार आहेत. याचबरोबर महापालिका हद्दीतील आठ किलोमीटरच्या नाल्यांचे सौंदर्यीकरण तसेच मागील आठवड्यात झालेल्या दोन भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध कामांचा विकास करून महापालिका सर्वसमावेशक सुविधा देत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
पनवेल महापालिकेच्या सुमारे 60 कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन मंगळवारी (दि. 15) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, शहराध्यक्ष अनिल भगत, माजी महापौर सीताताई पाटील, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, संतोष शेट्टी, मनोहर म्हात्रे, एकनाथ गायकवाड, हरेश केणी, विकास घरत, समीर ठाकूर, अभिमन्यू पाटील, नरेश ठाकूर, प्रवीण पाटील गुरूनाथ गायकर, माजी नगरसेविका आरती नवघरे, अनुसूचित सेल जिल्हाध्यक्ष अमित जाधव, भाजप जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, उपायुक्त कैलास गावडे, डॉ. वैभव विधाते, शहर अभियंता संजय कटेकर, कार्यकारी अभियंता सुधीर साळुंखे, उपअभियंता राजेश कर्डिले, अनिल कोकरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
या वेळी खांदा कॉलनी येथे माता रमाबाई आंबेडकर सांस्कृतिक भवन, खारघर से. 10 प्लॉट नं 251वर सामाजिक सभागृह, महापालिका हद्दीतील नाल्यांचे सौंदर्यीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …