Breaking News

पनवेलमधील विजेचा प्रश्न निकाली

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दोन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नव्याने दोन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आल्याने या परिसरातील वारंवार जाणार्‍या विजेचा प्रश्न निकाली लागला आहे. या कामासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेतला असून माजी नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते शनिवारी (दि.12) दसर्‍याच्या शुभमुहुर्तावर या ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन झाले.
पनवेल शहरातील लाईन आळी तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना तसेच प्रामुख्याने व्यापारी वर्गाला वारंवार विज जाण्याची समस्या भेडसावत होती. या समस्येबाबत त्यांनी माजी नगरसेविका दर्शना भोईर यांना माहिती दिली. त्यानुसार दर्शना भोईर यांनी पाठपुरावा सुरू करून ही समस्या मार्गी लावण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांना माहिती दिली. आमदारांनी त्वरीत विजेची समस्या मार्गी लावण्यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी जिल्हा नियोजन निधीमधून 40 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम काम पूर्ण झाले असून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत आणि माजी नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक राजू सोनी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, महावितरण विभागाचे अभियंता मंदार सावंत, श्रीलेशा दबडेन, श्वेता वाणी, संजय जाधव, भावीन शहा, यश चौगुले, बालाराम पाटील, अतुल जोशी, हर्ष परिहार, मोहम्मद अली उपस्थित होते.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply