पनवेल : वार्ताहर
पनवेलजवळील सुकापूर येथे नवजीवन सोसायटीच्या इमारतीचे दोन स्लॅब रात्री 12च्या सुमारास कोसळले. यात एका मुलाचा मृत्यू झाला आहे. शुभम सुरेश राजभर (वय 12) असे मृत मुलाचे नाव आहे.
तीन मजल्यांची नवजीवन ही इमारत आहे. या इमारतीचे पहिल्या आणि दुसर्या माळ्याचे स्लॅब कोसळले. घटना घडली त्या वेळी या इमारतीमध्ये तीन कुटूंब होती. इतरांनी वेळीच धावपळ केल्याने त्यांचे प्राण वाचले, मात्र बेडरूममध्ये झोपलेल्या शुभम राजभरचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन ढिगारा बाजूला केला.
Check Also
भव्य कटआऊट्स; चित्रपटाचं मोठेपण त्यातही
आज सगळीकडेच लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित ‘छावा’ची जबरदस्त क्रेझ आहे. चित्रपट शौकिनांपासून इतिहासाचे अभ्यासक आपापल्या पद्धतीनुसार …