Breaking News

पत्नीबरोबर संभोग करणे पतीचा मूलभूत अधिकार; न्यायालयाचा निर्णय

लंडन ः वृत्तसंस्था : लंडनमधील एका न्यायालयाने एक वेगळाच निर्णय दिला आहे. कोणताही पती आपल्या पत्नीबरोबर शारीरिक संबंध ठेवू शकतो. हा त्याचा मूलभूत अधिकार आहे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. इंग्लंड आणि वेल्स उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एपी हेडन यांनी हा निर्णय सुनावला आहे. न्यायाधीश हेडन यांनी कोर्ट ऑफ प्रोटेक्शनच्या एका प्रकरणात हा निर्णय दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका पत्नीने पतीबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता. त्यानंतर पतीने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.

कनिष्ठ न्यायालयाने पत्नीच्या बाजूने निर्णय देऊन 20 वर्षे संबंध प्रस्थापित करण्यावर बंदी घातली होती. त्यानंतर पतीने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. उच्च न्यायालयाने पतीच्या बाजूने निर्णय दिला. पतीला आपल्या पत्नीबरोबर शारीरिक संबंध ठेवण्याचा अधिकार आहे, तसेच कोणीही या पतीच्या मूलभूत अधिकारावर बंदी आणू शकत नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतर लेबर पार्टीनेही संसदेत यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत.

लेबर पार्टीचे खासदार म्हणाले, ब्रिटनमध्ये कोणत्याही व्यक्तीला जोरजबरदस्तीने सेक्स करण्याचा अधिकार नाही. अशातच एखाद्या पतीने पत्नीच्या विरोधात जाऊन शारीरिक संबंध ठेवल्यास तो बलात्कार समजला जातो, तसेच एका महिलेने ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, सेक्स हा काही मानवाधिकार नाही. न्यायालयाच्या निर्णयावर अनेकांनी असहमती दर्शवली आहे. पत्नीच्या इच्छेविरोधात शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा कोणत्याही पतीला अधिकार नसल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले आहे.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply