Breaking News

उरणमध्ये पाच ग्रामपंचायतींत कमळ फुलले

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी, बातमीदार

उरण तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी (दि. 20) जाहीर झाला असून रानसई या आदिवासी बांधवांच्या ग्रामपंचायतीवर भाजपने एक हाती सत्ता संपादित करून तालुक्यातील डोंगरी, भेंडखळ, रानसई, सारडे, करळ सावरखार अशा एकूण पाच ग्रामपंचायतीवर सरपंच पदाचे उमेदवार निवडून आणण्यात यश मिळविले आहे. सर्व विजयी भाजप उमेदवारांचे भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, नगरसेवक राजेश ठाकूर, तालुका सरचिटणीस कैलास भोईर, तालुका पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, हितेश शाह, उरण तालुका उपाध्यक्ष  मुकुंद  गावंड व भाजप कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले. उरण तालुक्यातील 18 ग्रामपंचायत निवडणूकीत घारापुरी ग्रामपंचायतीची निवडणूक ही बिनविरोध झाल्याने उर्वरित जसखार, भेंडखळ, नवघर, पागोटे, करळ, पुनाडे, वशेणी, सारडे, पिरकोन, धुतूम, चिर्ले, बोकडविरा, पाणजे, डोंगरी, नवीन शेवा, रानसई आणि कळंबुसरे या 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुका या 18 डिसेंबर रोजी झाल्या. त्यातील 17 ग्रामपंचायतीच्या निकाल हा उरण येथील निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी 20 डिसेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी जाहीर केला आहे. यामध्ये रानसई ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपविरोधात शिवसेना ठाकरे गटांमध्ये सरळ चुरशीची लढत झाली त्यामध्ये भाजपच्या सरपंच पदाच्या उमेदवार राधा मधुकर पारधी यांना 492 मते मिळाली (विजयी) असून ग्रामपंचायतीचे सहा सदस्य निवडून आणत भाजपाने एक हाती सत्ता संपादित केली आहे. जसखार ग्रामपंचायतीच्या शिवसेना ठाकरे गट- भाजप आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार काशिबाई हसुराम ठाकूर यांना 928 मते मिळाली (विजयी) तर पक्ष विरहित युवा गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार मंजुळा ठाकूर यांना 884 मते मिळाली. भेंडखळ ग्रामपंचायतमध्ये भाजपच्या सरपंचपदाच्या उमेदवार मंजिता मिलिंद पाटील यांना 799 मते मिळाली (विजयी) तर काँग्रेस-शेकाप आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार योगिता योगेश ठाकूर यांना 701 मते मिळाली आहेत. करळ ग्रामपंचायतमध्ये भाजपच्या सरपंच पदाच्या उमेदवार अनिता अरविंद तांडेल यांना 355 मते मिळाली (विजयी) तर दर्शना नितीन तांडेल यांना 344 मते मिळाली आहेत. डोंगरी ग्रामपंचायतमध्ये भाजपच्या सरपंच पदाचे उमेदवार संकेत दिलीप घरत यांना 546 मते मिळाली (विजयी), तर शिवसेना ठाकरे गटाचे सरपंच पदाचे उमेदवार निलेश नरेश घरत यांना 542 मते मिळाली आहेत. सारडे ग्रामपंचायतमध्ये भाजप सरपंच पदाचे उमेदवार रोशन पांडुरंग पाटील यांना 579 मते मिळाली (विजयी) तर शेकाप आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार चंद्रकांत राजाराम पाटील यांना 344 मते मिळाली आहेत. पिरकोन काँग्रेस-भाजपा आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार कलावंती काशिनाथ पाटील यांना 1399 मते मिळाली (विजयी)तर शेकाप युतीच्या सरपंच पदाच्या उमेदवार संगिता प्रशांत म्हात्रे यांना 1294 मते मिळाली.पाणजे ग्रामपंचायत निवडणुकीत मतमोजणीच्या वेळी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी दोघा उमेदवारांना सारखीच मते मिळाल्याने लहान मुलीच्या हातून चिठ्ठी काढून उमेदवार विजयी केल्याचे चित्र पाहावयास मिळाले होते. मत मोजणी प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला होता.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply