Breaking News

मुंबई शहर कबड्डी निवड चाचणी स्थगित

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई शहर कबड्डी असोसिएशनची जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा पावसाच्या संततधारेमुळे काही दिवसांकरिता स्थगित करण्यात आली आहे. या स्पर्धेला 4 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरुवात करण्यात येईल.

स्पर्धेची नवीन कार्यक्रम पत्रिका लवकरच तयार करण्यात येणार आहे. ती स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांना उपलब्ध करून देण्यात येईल.

स्पर्धेबाबत अधिक माहिती हवी असल्यास रविवार व सुटीचे दिवस वगळता संघटनेच्या कार्यालयात सायंकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत 24152999 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव विश्वास मोरे यांनी केले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply