Breaking News

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या 243 मूर्तींचे श्रीसदस्यांनी केले पुन्हा विसर्जन

मुरूड : प्रतिनिधी

पाण्यात विरघळत नसल्याने भरतीबरोबर मुरूड समुद्र किनारी वाहून आलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या 243 गणेशमूर्तीचे श्रीसदस्यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा खोल समुद्रात विसर्जन केले. मुरूड तालुक्यात गुरुवारी 10 दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले होते, मात्र दुसर्‍याच दिवशी पहाटे समुद्र किनार्‍यावर शेकड्याने मूर्ती वाहून आल्या होत्या. धर्माधिकारी प्रतिष्ठनच्या मुरूड तालुक्यातील सुमारे 100 श्रीसदस्यांनी शक्रवारी पहाटे 5 वाजल्यापासून 243 गणेशमूर्ती शोधून त्यांचे खोल समुद्रात पुन्हा विसर्जन केले.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply