Breaking News

बोरघाटात रुग्णवाहिका जळून खाक; ऑक्सिजनअभावी रुग्ण महिलेचा मृत्यू

खोपोली, खालापूर ः प्रतिनिधी
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात मंगळवारी (दि. 31) सायंकाळी एका रुग्णवाहिकेला अचानक आग लागल्याने ती जळून खाक झाली. तत्पूर्वी आतील व्यक्तींना बाहेर काढल्याने बचावल्या, मात्र व्हेंटिलेटरवर असणार्‍या महिला रुग्णाला ऑक्सिजन न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून कर्नाटक गुलबर्गा येथे महिला रुग्णास रुग्णवाहिकेतून नेत असताना बोरघाटात या रुग्णवाहिकेस अचानक आग लागली. लागलीच रुग्णवाहिकेतील महिला रुग्ण लीलाबाई भगवान कवलदार (वय 79, रा. ऐरोली, नवी मुंबई), तिचे नातेवाईक, डॉक्टर, चालक यांना ताबडतोब खाली उतरवण्यात आले. या वेळी रुग्णास ऑक्सिजन न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला.
यानंतर ही रुग्णवाहिका पेटत्या स्थितीत 50 मिटर मागे येऊन त्यातील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे रुग्णवाहिकेचे छताचा पत्रा व इतर लोखंडी पार्ट रोडवर इतस्ततः पडले, तर आग लागल्याने वाहतूक नियमन करण्याकरिता घटनास्थळी हजर असलेले पोलीस नाईक चेमटे यांची मोटरसायकल जाळून खाक झाली.
या वेळी जवळच आलेले पोलीस कर्मचारी व यंत्रणेतील कार्यकर्ते मदतीसाठी धावले. दरम्यान, या घटनेनंतर मुंबईहून पुण्याला जाणारी वाहतूक काही काळ थांबवावी लागली.

Check Also

पनवेल मनपा हद्दीतील पाणीपुरवठ्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली पाहणी

सर्व कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे …

Leave a Reply