Breaking News

‘चिरनेर’ चित्रपट 24 मे रोजी पडद्यावर

उरण : बातमीदार

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक जंगल सत्याग्रहावरील ’चिरनेर’ हा चित्रपट 24 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. अर्चना सिने हाऊस प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाला वंश इंटरप्रायजेसचे सहकार्य लाभले आहे.

विशेष म्हणजे याचे चित्रिकरण उरण तालुक्यातील चिरनेर परिसरातच करण्यात आले आहे.

सविनय कायदेभंग चळवळीत 25 सप्टेंबर 1930 रोजी चिरनेरजवळील अक्कादेवी टेकडीवर जुलमी इंग्रजांच्या हुकुमशाहीविरुद्ध येथील जनतेने सत्याग्रह केला. देश स्वतंत्र व्हावा, सर्वांना त्यांचे हक्क व अधिकार मिळावेत यासाठी महात्मा गांधीच्या मार्गदर्शनाखाली हा सत्याग्रह करण्यात आला, मात्र ब्रिटीशांनी सत्याग्रहींवर अमानूष गोळीबार केला. त्यात नाग्या महादू कातकरी (चिरनेर), धाकू गवत्या फोफेरकर, रघुनाथ मोरेश्वर न्हावी (कोप्रोली), रामा बामा कोळी (मोठी जुई), परशुराम रामा पाटील (पाणदिवे), हसूराम बुधाजी घरत (खोपटे), आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे) यांना वीरमरण आले, तर अनेकजण जखमी झाले. काळाच्या ओघात नवीन पिढीला याची जाणीव रहावी, या दृष्टिकोनातून ’चिरनेर’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

चिरनेर या चित्रपटाचे लेखक, निर्माता अर्चना नागेश गोमे आहेत. चित्रपटात संजय मोने, प्रदीप पटवर्धन, संजय सेज्वळ आणि अर्चना गोमे मुख्य भूमिकेत असून, स्थानिक कलाकारांचाही सहभाग आहे. तब्बल चार वर्षांच्या खडतर परिश्रमानंतर हा चित्रपट तयार झाला आहे.

Check Also

विरोधकांकडून होणारा अपप्रचार खोडून काढा; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पनवेल ः रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीप्रमाणे या विधानसभा निवडणुकीतही विरोधकांकडून स्वार्थापोटी खोटा प्रचार करून जनतेची …

Leave a Reply