Breaking News

विद्या प्राधिकरणकडून पूरग्रस्तांना मदत

नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्त

प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई येथील संस्थेत कार्यरत अधिव्याख्याता, विषय सहाय्यक, साधनव्यक्ती, कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांच्या योगदानातून कोल्हापूर येथील पूरग्रस्त जिल्हा परिषद शाळा शिये नं. 2 या शाळेतील विद्यार्थ्यांना प्राधिकरणाच्या वतीने वह्यांचे वाटप करण्यात आले. साहित्यवाटप करण्यासाठी प्राधिकरणाची टीम तयार करण्यात आली होती. या टीममध्ये निंबाजी गीते, संतोष सोनवणे, विनोद घोरपडे, प्रवीण पाटील यांचा समावेश होता. कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य आय. जी. शेख, तसेच एस. पी. पाटील, मुंबई व शाळेतील शिक्षक  उपस्थित होते.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply