Breaking News

अमिटी विद्यापीठातील कामगारांच्या वेतनासंदर्भात 15 दिवसांत माहिती द्या

मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश

मुंबई ः रामप्रहर वृत्त
भाताण येथील अमिटी विद्यापीठातील कामगारांच्या वेतनासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. 10) बैठक झाली. या वेळी मंत्रीमहोदयांनी दूरदुष्यप्रणालीद्वारे सहभागी होत युजीसी नियमानुसार प्रत्येक कामगाराला किती पगार देणार याची माहिती 15 दिवसांच्या आत मंत्रालयात सादर करण्याचे आदेश अमिटी विद्यापीठास दिले.
आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी राज्य विधीमंडळाच्या मागील अधिवेशनात अमिटी विद्यापीठाकडून भाताण ग्रामपंचायतीला थकीत कर मिळण्याबाबत व विद्यापीठातील कामगारांना शासकीय नियमानुसार पगार मिळण्यासंदर्भात मुद्दे उपस्थित केले होते. त्यानुसार ग्रामविकास मंत्रालयामार्फत केलेल्या कारवाईमुळे भाताण ग्रामपंचायतीला दोन कोटी 26 लाख एवढा भरघोस निधी मिळाला.
मंत्रालयात गुरुवारी झालेल्या बैठकीत आमदार महेश बालदी यांनी अमिटी विद्यापीठातील कामगारांना युजीसी नियमानुसार पगार मिळाला पाहिजे अशी मागणी केली. शिक्षण विभागाने ती मान्य केली. या वेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठास 15 दिवसांच्या आत युजीसी नियमानुसार प्रत्येक कामगाराला किती पगार देणार आहात याची माहिती मंत्रालयात देण्याचे आदेश दिले. मंत्रीमहोदयांच्या या निर्णयामुळे कामगारांना लवकरच न्याय मिळणार असल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या बैठकीस भाजपचे गुळसुंदे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष तथा अमिटी विद्यापीठ नियामक मंडळाचे सदस्य डॉ. अविनाश गाताडे, भाताणचे सरपंच तानाजी पाटील, बूथ अध्यक्ष अनिल भोईर, कामगार प्रतिनिधी तकदीर सते, प्रकाश भोईर, दत्तात्रेय पाटील, नितेश पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply