Breaking News

सर्वांनी स्वच्छतेचा मूलमंत्र जपला पाहिजे; पनवेलमध्ये विविध सुविधांचे उद्घाटन; आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल शहर स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त आग्रही झाले पाहिजे. सर्व नागरिकांनी स्वच्छतेचा मूलमंत्र जपला पाहिजे, असे आवाहन भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 9) येथे केले. ते विकासकामांच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक-नगरसेविका नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव कार्यरत असतात. त्यानुसार नगरसेविका दर्शना भोईर यांच्या पाठपुराव्यातून शहरातील रोज बाजारमध्ये ई-टॉयलेट आणि विरंगुळा केंद्र सुरू झाले आहे. त्याचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर आणि नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते झाले, तसेच नव्याने स्थापन झालेल्या रोज बाजार भाजी मार्केट स्वयंसहाय्यता महिला मंडळाच्या नामफलकाचे अनावरण या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपचे पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, प्रभाग क्रमांक 19चे अध्यक्ष पवन सोनी, ओबीसी सेल तालुका उपाध्यक्ष शांताराम पाटील, चंद्रकांत मंजुळे, सपना पाटील, मधुकर उरणकर, राजू कोळी, संतोष ढगे, हरिश्चंद्र भगत, हंसा सुरते, बन्सी कुटे, साहेबराव घुमरे, आत्माराम व्हावर, नवनाथ बोकडे, विशाल तळेकर, प्रशांत तारेकर, महेश गायकर, शोभा पवार, अनिशा तळेकर, वैशाली तळेकर, अनिता तळेकर, ज्योती गुप्ता, रंदुबाई कोल्हे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रोज बाजारमधील व्यवसायिक उपस्थित होते. या वेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेला स्वच्छतेचा मंत्र नव्याने राबवण्यास सुरुवात केली आणि प्रचंड परिवर्तन पाहायला मिळाले. पाच वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेने एक एक पाऊल टाकत स्वच्छतेबाबत देशपातळीवर पुरस्कार मिळवायला सुरुवात केली आहे. त्याचा प्रभाव शहराच्या प्रत्येक गल्लीपर्यंत व्हायला हवा. प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी स्वच्छतेचा आग्रह धरला पाहिजे.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply