Breaking News

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. या घटनेत तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये तीन नौदल कर्मचार्‍यांचाही समावेश आहे. तसेच या बोटमधून 101 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. बचावकार्यात सुरूच आहे. त्यामुळे सविस्तर माहिती उद्यापर्यंत प्राप्त होईल, असे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले.
मुंबईवरून एलिफंटाकडे नीलकमल ही बोट जात होत, मात्र या बोटीला गेट ऑफ इंडियाजवळ ही बोट बुडाल्याची घटना घडली. या बोटेतून 100 पेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करत होते. ही दुर्घटना घडल्यानंतर लगेचच तातडीने मदतकार्य करण्यात आले. यावेळी नौदलाने या बोटीमधील 101 प्रवाशांना सुरक्षित वाचवले. तर या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अद्यापही नौदलाकडून आणि पोलिसांच्या समन्वयाने बचाव कार्य करण्यात येत आहे. यामध्ये चार नौदलाचे हेलिकॉप्टर, 11 नौदल क्राफ्ट आणि एक तटरक्षक दलाची नौका आणि तीन सागरी पोलीस नौका बचावकार्य करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
नौदलाचे व्हाईस डमिरल संजय जगजित सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, नौदलाच्या डॉक्टरांनी सायंकाळी 7.30 पर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात तीन नौदलाचे जवान असून 10 नागरिक आहेत. दोन गंभीर जखमींना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत
मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल. या घटनेची नौदल आणि राज्य सरकारमार्फत चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवरील (ट्विटर) पोस्टमध्ये म्हटलं आहे.
प्रत्यक्षदर्शीने सांगितले…
बोट पाच ते सात किमी समुद्रात होती. त्यावेळी मी बोटीच्या डेकवर उभा होतो. एक स्पीड बोट आमच्या आजूबाजूला फिरत होती. ही स्पीडबोट भरधाव वेगाने आली आणि आमच्या बोटीला जोरात धडकली. त्यावेळी स्पीडबोटमधल्या काही प्रवाशांचा मृत्यू झाला. आमच्या बोटीत पाणी शिरू लागले आणि बोट बुडू लागली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने दिली आहे.

Check Also

पनवेल मनपा हद्दीतील पाणीपुरवठ्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली पाहणी

सर्व कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे …

Leave a Reply