Breaking News

वलप, नितळसमध्ये भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल विधानसभा मतदारसंघात विकासाची विविध कामे होत आहेत. या अंतर्गत मंगळवारी (दि. 15) सकाळी पनवेल मतदारसंघातील वलप आणि नितळस येथील रस्त्यांच्या काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आला.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 70 लाख रुपयांच्या निधीतून वलप गावातील गणेश नगर मुख्य रस्ता ते विश्वनाथ म्हात्रे यांच्या घरापर्यंतचा रस्ता, गणेश नगर मुख्य रस्ता ते प्रकाश सांगडे यांच्या घरापर्यंतचा रस्ता, वल्लभ आदिवासीवाडी रस्ता आणि साईनगर वलप रस्ता तसेच नितळस येथील 10 लाख रुपयांच्या निधीतून गावदेवी मंदिरासमोरील रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे.
या भूमिपूजन सोहळ्याला भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, माजी जि.प. सदस्य एकनाथ देशेकर, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, खैरणे ग्रामपंचायतीचे सरपंच शैलेश माळी, राजेंद्र गोंधळी, प्रदीप माळी, दीपक उलवेकर, अशोक उलवेकर, निलेश दाढावकर, सागर सांगळे, सज्जन पवार, ग्रामपंचायत सदस्य जोत्स्ना पाटील, नवनाथ खुटारकर, ग्रामसेविका रेश्मा गावंड, राजेश पाटील, अंकुश पाटील, परेश पाटील, हरिश्चंद्र खाडेकर, केशव टेंबे, विश्वनाथ म्हात्रे, सदानंद वनगे, निलेश कुटाळकर, वैभव उसाटकर, जयदीप टेंबे, संगम भोईर, पांडुरंग वाघे, नितळस ग्रामपंचायत सदस्य दर्शना पावशे, नारायण काठे, सोपान काठे, दशरथ सांगडे, वसंत म्हात्रे, चंद्रकांत भोपी, अविनाश गायकर, तुळशीराम पाटील, धर्मनाथ तांबडे आदी उपस्थित होते.
या वेळी भाजप तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांनी सांगितले की, गेली अनेक दशके शेकापची या तालुक्यावर सत्ता होती, मात्र त्यांनी गावांच्या विकासासाठी कधी विचार केला नाही. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून 2009पासून कोट्यवधी रुपयांची कामे संपूर्ण मतदारसंघात होत आहेत. त्यांच्या रूपाने आपल्या तालुक्याला विकासपुरुष आमदार लाभला आहे याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नेहमीच राहील.

Check Also

पनवेलच्या महाळुंगीतील शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल ः रामप्रहर वृत्त कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पनवेल …

Leave a Reply