म्हसळा : प्रतिनिधी
तालुक्यांतील संयुक्त व्यवस्थापन केलटे, ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ व म्हसळा वन क्षेत्र विभागाच्या माध्यमातून केलटे येथे सोमवारी (दि. 1) वृक्ष लागवड तालुक्यातील वृक्ष लागवड मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. म्हसळा तालुक्यात 11 लाख 64 हजार 998 वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे.
प्रास्ताविकात वनपाल बाळकृष्ण गोरनाक यानी वनांचे महत्त्व विषद केले. या वेळी रोहा वन विभागाचे सहाय्यक वन संरंक्षक के.व्ही. गोडबोले, तहसीलदार शरद गोसावी, वन क्षेत्रपाल निलेश पाटील, लागवड अधिकारी कुलदिप पाटकर, रामचंद्र बोर्ले, गणेश बोर्ले, उमेश पवार, किसन पवार, मुकुंद बोर्ले, ज्ञानेश्वर कोबनाक, धाडवे यांच्यासह स्थानिक महिला मंडळाच्या प्रतिनिधी, माध्यमिक व प्राथमिक शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– म्हसळा तालुक्यात 11 लाख 64 हजार 998 वृक्ष लागवड करण्याचा संकल्प आहे. कडुलिंब, आवळा, सिसव, हिरडा, वेला, काजू, कांचन, करंज, बहावा, बांबू, खैर आदी स्थानिक प्रजातींची झाडे लागवडीस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
-निलेश पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी, म्हसळा