Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांचा झंझावात सुरू आहे. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा आणि प्रयत्नांमुळे मंजुर झालेल्या तब्बल एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ भाजपचे पनेवल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी झाले. या वेळी त्यांनी प्रत्येकाने गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील रहायला पाहिजे असे प्रतिपादन करून केंद्र आणि राज्य शासनाने सर्वसामान्यांसाठी राबवलेल्या योजनांची माहिती नागरीकांपर्यत्त पोहचवा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
पनवेल विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर हे सातत्याने काम करून नागरीकांना विकासकामांच्या माध्यामतून विविध सुविधा उपलब्ध करून देत आहेत. त्याअंतर्गत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 1 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्प निधीतून चिंध्रण देवीचापाडा रस्त्याच्या काँक्रिटीकरणासह सुधारणा करण्यात आली आहे. या कामाचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. तसेच यावेळी 10 लाख रुपयांच्या स्थानिक ग्रामविकास निधीतून चिंध्रण अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण, 15 लाख रुपयांच्या निधीतून चिंधणमधील अंतर्गत गटार बांधणे आणि रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि 10 लाख रुपयांच्या स्थानिक जिल्हा परिषद सेस निधीतून चिंधणमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यात येणार आहे. या कामांचेही भुमीपूजन तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमांना भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, शिवाजीराव दुर्गे, पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा कमला देशेकर, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, खैरणेचे सरपंच शैलेश माळी, सरपंच एकनाथ पाटील, शिरवलीचे माजी सरपंच तुकाराम पाटील, नितीन काठावले, भाजप नेते अशोक साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण पाटील, भाजप नेते प्रदीप माळी, रविंद्र पाटील, बाळू काठे, युवा नेते विजय म्हात्रे, भगवान खानावकर, पाले बुद्रुकचे माजी उपसरपंच दीपक उलवेकर, भाजप नेते प्रकाश खैरे, हरिश्चंद्र पाटील, समाजसेवक भगवान कडू, युवानेते अंकुश पाटील, माजी सरपंच भगवान पाडेकर, युवानेते कैलास मढवी, जेष्ठ नेते लक्ष्मणबुवा कडू, भाजप ओबीसी सेलचे माजी उपसरपंच गणपत कडू, ग्रामपंचायत सदस्या दिपाली सोनावळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष देशेकर, मनोज कुंभार, सुरेश पाटील, माजी उपसरपंच नरेश सोनावळे, अनंता कडू, हिरामण पाटील, सदस्य आत्माराम पाटील, माजी सदस्य प्रकाश पाटील, पोलीस पाटील रामदास पाटील, युवा नेते रोहिदास पाटील, समाजसेवक धनाजी कडू, भाजप नेते एकनाथ मुंबईकर, राम देशेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply