Breaking News

आरोग्य शिबिरात ‘सीकेटी’चा सहभाग

पनवेल : वार्ताहर

सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य व औषधोपचार शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) 300 स्वयंसेवकांनी मोलाची भूमिका बजावली.

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, रायगड मेडिकल असोसिएशन आणि पनवेल भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आरोग्य महाशिबिरात जवळ जवळ आठ हजार 500 रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात सीकेटी महाविद्यालयाच्या एनएसएस विद्यार्थ्यांनी विविध कक्षांमध्ये झालेल्या तपासणी व औषधोपचारासाठी मदत केली.

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक जाणिवेतून आयोजित या महाशिबिरात एनएसएस स्वयंसेवकांनी केलेल्या कामाचे सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  वसंत बर्‍हाटेम, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी कौतुक केले.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply