Breaking News

आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिका आणि राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत महापालिका क्षेत्रामध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत पनवेल कोळीवाडा येथील जरीमरी मंदिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन गुरुवारी (दि. 29) करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन नगरसेवक राजू सोनी यांच्या हस्ते आणि नगरसेविका दर्शना भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या वेळी माजी नगरसेविका सुनंदा भगत, मनोज जैन, दीपक कुलकर्णी, गणेश भगत, हरिश्चंद्र भगत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते, तसेच या वेळी सदस्य नोंदणी केलेल्यांना कार्ड वाटपही करण्यात आले.

Check Also

पनवेलमधील कलाकार भविष्यात अभिनय क्षेत्रात चमकतील -लोकनेते रामशेठ ठाकूर

प्रशिक्षण शिबिराचा शानदार समारोप पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेलचे नाव कला, क्रीडा क्षेत्रात गाजत आहे. महापालिकेचा …

Leave a Reply