Breaking News

महाडमधील मनसैनिक भाजपमध्ये

महाड : प्रतिनिधी

आमदार प्रविण दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाड नवेनगर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी नुकताच भाजपत प्रवेश केला.  महाड नवेनगर येथील कट्टर मनसैनिक अमोल सुंभे आणि विजय जाधव यांनी आमदार प्रविण दरेकर यांच्या वाढदिवसादिनी भाजपत जाहीर प्रेवेश केला. भाजपचे  महाड तालुका उपाध्यक्ष चंद्रजित पालांडे,  सरचिटणीस महेश शिंदे  आणि शहर अध्यक्ष निलेश तळवटकर यांच्या पुढाकाराने अमोल सुंभे, विजय जाधव हे मनसैनिक भाजपत दाखल झाले. मुंबईत आमदार प्रविण दरेकर यांच्या वाढदिवसादिनी भाजप जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, निलीमाताई राजेय भोसले, तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, वाहतूक सेल जिल्हा अध्यक्ष नाना पोरे, युवा मोर्चाचे सुमेध भोसले, विश्वतेज भोसले, तालुका उपाध्यक्ष अ‍ॅड. सुरज जामदार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. दरम्यान, आमदार दरेकर यांनी विजय जाधव यांची वाहतूक सेल जिल्हा सरचिटणीस पदी तर अमोल सुंभे यांची कामगार सेलच्या महाड तालुका सरचिटणीस पदी नियुक्ती केली.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply