Breaking News

आदिवासीवाडीतील कार्यालयाला पंख्यांचे वाटप

पनवेल : वार्ताहर

पनवेलजवळील कष्टकरी नगर येथील असलेल्या कार्यालयाला पार्श्व वुमन्स सामाजिक संस्था, पनवेल तालुका पत्रकार विकास मंच संस्था व संजय जैन मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने छताचा पंखा भेट देण्यात आला. काही दिवसापूर्वी येथील आदिवासी बांधवांना 100 ब्लँकटचे वाटप पार्श्व वुमन्स सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा बसंती जैन, पनवेल तालुका पत्रकार विकास मंच संस्थेचे अध्यक्ष माधव पाटील, संजय जैन मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय जैन, पत्रकार संजय कदम, हरेश साठे, नितीन कोळी, राजू गाडे, पार्श्व वुमन्स सामाजिक संस्थेच्या निशा जैन, विमला जैन, शिखा जैन, किंजल जैन, शितल जैन, कल्पना जैन, ग्रामपंचायत सदस्या गौरा राठोड, नंदिनी आटपाटकर, प्रतिक भोईर, सुनील राठोड आदींच्या उपस्थितीत करण्यात आले होते. हा कार्यक्रम ज्या सभागृहात घेण्यात आला होता. तेथे एकही पंखा नव्हता. सध्या थंडीचे दिवस असले तरी आगामी उन्हाळी व पावसाळ्याच्या काळात येथे कार्यक्रम असल्यास उपस्थितांचे मोठे हाल होत असतील. हे पाहून संजय जैन मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय जैन यांनी तत्परतेने या ठिकाणी छताचा पंखा देण्याचे कबूल केले व तो पंखा लगेच कार्यकर्त्यांकडे पाठवून दिला. या वेळी सुनील राठोड व त्यांच्या सहकार्‍यांनी  पंखा बसवून घेतला. त्यामुळे येथे होणार्‍या कार्यक्रमात आता गरमीचा त्रास उपस्थित बांधवांना होणार नसल्याचे समाधान संजय जैन यांनी व्यक्त केले आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply