पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी (दि. 7) मोठ्या उत्साहात झाला. हा कार्यक्रम रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पनवेल कोकण विभाग उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. संजय जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. महात्मा फुले महाविद्यालयात झालेल्या या पारितोषिक वितरण सोहळ्यात विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे पीएचडी तसेच सेट-नेट परीक्षांत उल्लेखनीय कामगिरी करणार्या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते विषेश सत्कार करण्यात आला. या वेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य तथा पनवेल भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, कामगार नेते महेंद्र घरत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, उपप्राचार्य ए. डी. आढाव, जी. जे. कोराणे, पी. पी. भस्मे, जिमखाना चेअरमन आर. ए. पाटील, प्रा. जे. व्ही. बोरगावे, डॉ. नरेश मढवी, केअर ऑफ नेचर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजु मंबईकर, क्रीडा शिक्षक एन. एस. शिरसाठ, विद्यार्थी परिषद अध्यक्ष निखिल धुळनकर, यांच्यासह पत्रकार, शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. प्रफुल्ल वशेनिकर, डॉ. यशवंत उलवेकर आणि प्रा. डॉ. लीना मिश्रा यांनी केले.