Breaking News

उरणमधील ग्रामपंचायतींकडूनही साहित्य

उरण ः प्रतिनिधी

उरण पंचायत समितीच्या वतीने उरण तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील नागरिकांना मदत देण्याच्या करण्यात आलेल्या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून वस्तू रूपाने अनेकांनी या पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी उरण पंचायत समितीच्या वतीने पुढाकार घेण्यात आलेले विस्तार अधिकारी अनिल नारंगीकर, ग्रामविकास अधिकारी किरण केणी, प्रवीण खैरे, अनिरुद्ध पाटील व रवींद्र गावंड यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली आहे. तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचातीच्या नागरिकांनी तांदूळ, गहू, गोडेतेल, चहापत्ती, तूरडाळ, तिखट, बेसन, साखर, कांदे, बटाटे, सॅनिटरी नॅपकिन, साबण, बिस्कीट, टुथपेस्ट, मेणबत्ती, कापूर, काडीपेटी यासारख्या जीवनावश्यक वस्तू उरण तालुक्यातून घरोघरी भेटी घेऊन जमा केल्या.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply