नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संसदीय अर्थसंकल्पादरम्यान सभागृहात गोंधळ घातल्यामुळे तसेच लोकसभेत सभापतींकडून पत्र काढून घेतल्याप्रकरणी काँग्रेसच्या सात खासदारांना गुरुवारी (दि. 5) निलंबित करण्यात आले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही कारवाई केली.
निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये गौरव गोगोई, टीएन प्रथापन, डीन कुरियाकोसे, आर उनीथन, मनीकम टागोरे, बेनी बेहनन व गुरजीत सिंह यांचा समावेश आहे. दिल्लीतील हिंसाचारावरून चर्चा सुरू असताना काँग्रेस नेत्यांकडून गदारोळ करण्यात आला. यामुळे सभापतींना कामकाज तहकूब करावे लागले होते. काँग्रेसकडून संसदेच्या अधिवेशनादरम्यान कामकाजात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा खासदारांना हा दणका आहे.