Breaking News

भारतीय महिलांची जपानवर 3-1 ने मात

पंतप्रधानांनीही केले अभिनंदन

लंडन : वृत्तसंस्था

जपानच्या हिरोशीमा शहरात पार पडलेल्या एफ आएच स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने अंतिम फेरीत यजमान जपानवर 3-1 ने मात करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. आशियाई खेळांचं जेतेपद मिळवलेल्या जपानची कडवी झुंज मोडून काढत भारतीय महिलांनी ऑलिम्पिक पात्रता फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवीन क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनीही भारतीय महिला संघाचं अभिनंदन केलं आहे.

कर्णधार राणी रामपालने तिसर्‍या मिनीटाला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. जपानकडून कानोन मोरीने 11 व्या मिनीटाला गोल करत सामन्यात बरोबरी साधली. यानंतर भारतीय महिलांनी जपानला सामन्यात डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. गुरजित कौरने 45 व्या आणि 60 व्या मिनिटाला गोल करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply