खारघर : रामप्रहर वृत्त : रविवार सुटीचा दिवस असल्याने सुटीचा सदुपयोग करण्यासाठी खारघरच्या काही नागरिकांनी एकत्र येऊन खारघर सेक्टर 19 येथील खेळाच्या मैदानावरील झाडांना पाणी देणे तसेच मैदानात स्वच्छता अभियान राबवून मैदाने स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला.
या वेळी जमलेल्या नागरिकांनी मैदानाच्या सभोवताली असणार्या सर्व झाडांना पाणी देण्याचे अभियान राबविले आणि यापुढेसुध्दा येणार्या प्रत्येक रविवारी झाडांना पाणी देण्यासाठी आम्ही एकत्र येऊ असा निर्धार केला.
या स्वच्छता अभियानात भाजप खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, किरण पाटील, पाटीदार बंधू, नरेंद्र पटेल, कल्पेश पटेल, अरविंद पटेल, कनूभाई पटेल, उत्सव पटेल, स्मित पटेल, जीवराज चौधरी, प्रशांत वैद्य आदींनी सहभाग घेतला होता.