Breaking News

उद्यापासून देशांतर्गत विमानसेवाही होणार बंद

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे थांबवल्यानंतर आता देशांतर्गत विमान सेवादेखील खंडीत करण्याचा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी (दि. 23) घेतला. या निर्णयानुसार 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून ही सेवा बंद राहणार आहे. या संदर्भात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या परिपत्रकानुसार, देशांतर्गत व्यावसायिक प्रवासी विमान सेवा 24 मार्चच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून बंद राहणार आहे. त्यामुळे या दिवशी सर्व विमान कंपन्यांना त्यांचे देशातील प्रवासी निश्चित ठिकाणी रात्री 12 वाजण्याआगोदरच उतरावे लागतील. दरम्यान, प्रवासी विमानांची उड्डाण थांबणार असली तरी मालवाहतुकीच्या विमान उड्डाणांना हा आदेश लागू नसेल. त्यामुळे या विमानांची उड्डाणे नेहमीप्रमाणेच सुरू राहतील.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply