Breaking News

नियमांचे उल्लंघन करणार्या लग्नसोहळ्यांवर कारवाई

पनवेल : वार्ताहर

पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील नेरे गावातील आताशा रिसॉर्टवर, करंबेळी येथील एका लग्न कार्यालय, तालुक्यातील बेलवली गाव येथेही लग्न समारंभास शासन नियमापेक्षा अधिक लोक जमविल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.

कोविड 19 या संसर्ग जन्य आजाराचा प्रसार होऊ नये दिवसागणिक वाढणारी रुग्णसंख्या आटोक्यात यावी या करिता महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. शासन आदेशाप्रमाणे लग्न समारंभास 25हुन अधिक लोक जमण्यास मनाई असताना आताशा रिसॉर्टमध्ये 100 ते 150 लोक या लग्न सोहळ्यास उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.

आताशा रिसॉर्ट हे पनवेल तालुका पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस चौकी जवळच आहे. करंबेळी येथे लग्न कार्यक्रमासाठी नागरिक जमवून शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. बेलवली येथे सुद्धा अशाच प्रकारे मास्क न परिधान तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता विवाह सोहळ्यास उपस्थित राहिल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

निर्बंधांच्या काळात नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करूनच लग्न सोहळे करावेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घालण्यात आलेले नियम हे सर्वांनी पाळण गरजेचे आहे. नियम न पाळणार्‍यांवर कारवाई केली जाईल.

-रवींद्र दौंडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply