Breaking News

पनवेलमध्ये कोरोनाचे 40 नवीन रूग्ण

सहा महिन्यांच्या चिमुकलीचाही समावेश

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 31)  कोरोनाचे 40 नवीन रुग्ण सापडले असून 19 जणांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका क्षेत्रात 30 नवीन रुग्ण सापडले आहेत. यामध्ये कामोठे नऊ कळंबोली आठ, खारघर सात आणि पनवेल दोन, नवीन पनवेल तीन आणि खांदा कॉलनी मधील एका नवीन रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीणमध्ये 10 नवीन रुग्ण सापडले असून उलवे मधील सहा महिन्याच्या चिमुकलीचा त्यामध्ये समावेश आहे पनवेल तालुक्यात आजपर्यंत कोरोनाचे 729 रुग्ण झाले असून 446 जणांनी कोरोंनावर मात केली आहे. 31 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात रविवारी कामोठ्यात नऊ नवीन  रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कामोठयातील रुग्णाची संख्या 198  झाली आहे. यामध्ये सेक्टर 35 मधील चंद्रभागा सोसायटीतील एकाच कुटुंबातील दोघांचा समावेश आहे. सेक्टर 7 मधील साई प्रसाद सोसायटीतील एकाला कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय एक हॉस्पिटलमध्ये कार्यरत व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. सेक्टर16, 5, 21, 25 आणि 11 मध्ये एक नवीन रुग्ण सापडला आहे. कळंबोलीमध्ये ही आठ नवीन रुग्ण सापडल्याने तेथील रुग्णाची संख्या 92 झाली आहे. सेक्टर 8 ई मधील बियांका सोसायटीतील तिघांना लागण झाली आहे. सेक्टर 14 मधील विनायका सोसायटीतील एकाच कुटुंबातील दोघांना लागण झाली आहे. सेक्टर 6 सेक्टर चार आणि टेंबोडेमध्ये प्रत्येकी एका रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

खारघरमध्ये सात नवीन रुग्ण सापडल्याने 115  रुग्ण झाले आहे. त्यामध्ये सेक्टर 1 शांतिनिकेतनमधील एकाच कुटुंबातील दोघांचा समावेश आहे. सेक्टर 20, सेक्टर  10 आणि कोपरागावमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. रोहिंजणमधील साठे निवासातील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. पनवेल तक्का येथील प्रजापती बिल्डिंगमधील आणि दर्गा येथील एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे त्यामुळे पनवेलमधील कोरोना बाधितांची संख्या 35 झाली आहे. नवीन पनवेलमधील सेक्टर 4 इन्द्रलोक, सेक्टर 10 शिवम मार्केट आणि सेक्टर 16 मधील लक्ष्मी विष्णु कॉम्प्लेक्समधील एकाला कोरोना झाला आहे. नवीन पनवेल मधील कोरोना रुग्णांची संख्या 79 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात रविवारपर्यंत 2946 टेस्ट करण्यात आल्या 526  जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून 129  जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहेत. 315 रुग्ण बरे झाले असून 189   रुग्णावर उपचार सुरू आहेत. 22 जणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण

59.89 टक्के आहे. पनवेल ग्रामीणमध्ये रविवारी 10 नवीन रुग्ण सापडले असून सात जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये उलवे येथील सहा रुग्णांचा समावेश आहे. सेक्टर 19 रिध्दी-सिध्दी मधील एकाच कुटुंबातील सहा महिन्याच्या चिमुकलीसह एक महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. उसर्ली खुर्द ओम साई घरकुल मधील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. पाली देवद, आणि पोयंजे येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply