पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी करण्यासाठी सर्व मित्र पक्षांनी आपली ताकद लावली आहे. या अनुषंगाने ज्येष्ठ नेते जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीची बैठक गुरुवारी (दि. 7) पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झाली.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेली विकासकामे तसेच महायुतीच्या वतीने राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहचवण्याचा आणि आमदार प्रशांत ठाकूर यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.
या बैठकीला लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष सीताराम कांबळे, पनवेल तालुका अध्यक्ष विद्यानंद जाधव, युवा अध्यक्ष सचिन तांबे, गणेश मार्केट विक्रेता संघाचे सदस्य विलास जाधव यांच्यासह पीआरपी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांना होणार फायदा मुंबई : रामप्रहर …
RamPrahar – The Panvel Daily Paper