नवी मुंबई : बातमीदार
सेकटर 16 व 16 ए, 18 येथे जंतुनाशक फवारणी स्वखर्चाने करतानाच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये फूट स्टेपिंग सॅनिटायर्झसचे वितरण करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते गणेश भगत, भाजपच्या माजी नगरसेविका रूपाली भगत, भाजपचे नेरूळ तालुका अध्यक्ष राजू तिकोणे व समाजसेविका उल्का तिकोणे यांच्या माध्यमातून दोन प्रभागातील रहीवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. कोरोना काळात रहीवाशांची काळजी घेताना भाजपकडून या दोन्ही प्रभागात लोकोपयोगी कार्यक्रम राबवण्यात आले. त्यानंतर गृहनिर्माण सोसायट्यांच्या बाहेरील व अंर्तगत भागात सॅनिटायर्झसची फवारणी करण्यात आली व लोकाग्रहास्तव सॅनिटायजर फूट स्टेपिंग बसवण्यात आले आहेत. सध्या लोकडाऊन सुरू असला तरी नियमांत शिथिलता अली आहे. त्यामुळे वैयक्तीक सुरक्षिततेकडे काहीसे दुर्लक्ष होऊ लागले आहे. सुरुवातीच्या काळात प्रत्येक नागरिक स्वतःजवळ सॅनिटायजर बाळगत होता. मात्र आता नागरिकांकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सोसायट्यांमध्ये येतानाच नागरिकांनी स्पर्श न करता सॅनिटायजर लावूनच बाहेर अथवा परत यावे यासाठी हे स्टँड बसवण्यात आले आहेत. त्यामुळे स्वतःसोबत सोसायटीतील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहणार आहे. या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे. या वेळी समाजसेवक संजय सपकाळ, प्रमोद प्रभू, आशिष कदम,अशोक गांडाल, सत्यवान घाडी, सागर मोहिते, सूर्या पात्रा, विकास तिकोने, ऋषिकेश भुजबळ, विजय पाथारे, रविंद्र भगत यांनी विशेष मेहनत घेतली.