पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातील कामोठे येथील पदाधिकार्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये बुधवारी (दि.6) जाहिर पक्ष प्रवेश केला. त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन त्यांचे स्वागत केले आणि भाजप परिवारामध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
कामोठेमध्ये झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे पनवेल जिल्हा पदवीधर मतदार संघाचे सचिव तुषार सांळुंखे यांच्यासह सनी बगाडे, किरण भगत, राजाराम बनकर, हरिश्चंद्र घाग, अमित सोनावणे, सचिन पाटील, यांनी भाजपचे विकासाचे कमळ हाती घेतले.
या पक्ष प्रवेशावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी.देशमुख, कामोठे मंडळ अध्यक्ष रवींद्र जोशी, युवा नेते हॅप्पी सिंग, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भगत, हर्षवर्धन पाटील, हरजींदर कौर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …