Breaking News

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्या अनुषंगाने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय, पीआरपी आणि मित्र पक्ष महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने त्यांचा प्रचार करत असून मतदारांचा आशीर्वाद आमदार प्रशांत ठाकूर यांना मिळत आहे.
पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांचा झंझावाती प्रचार सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागझरी, ढोंगर्‍याचा पाडा, पाले खुर्द, देवीचापाडा, तोंडरे, पडघे, नावडे गाव, नावडे कॉलनी, खिडूकपाडा, टेंभोडे आणि वळवली गावात आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी सोमवारी (दि. 4) प्रचार केला. त्यांचे रांगोळी काढून आणि औक्षण करून स्वागत करण्यात आले, तर ज्येष्ठांनी त्यांना विजयाचा आशीर्वाद दिला. युवकांनीदेखील जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता.
या प्रचारात भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस भूपेंद्र पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, शशिकांत शेळके, मारूती चिखलेकर, युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस दिनेश खानावकर, प्रभाग क्रमांक 2चे अध्यक्ष कृष्णा पाटील, नारायणशेठ पाटील, सुरेशशेठ खानावकर, वासुदेवशेठ पाटील, महेश पाटील, अशोक पाटील, श्रीनाथ पाटील, शुभम खानावकर, आशिष कडू, पवन भोईर, भारत म्हात्रे, समीर गोंधळी, सागर भोईर, गौरव भोईर, अशोकशेठ साळुंखे, काळूरामशेठ फडके, महेंद्र म्हात्रे, आकाश फडके, करण फडके, रामदासशेठ फडके, सुदेश फडके, विशाल खानावकर, मदन खानावकर, रूपेश खानावळ, रूपेश खानावकर, प्रशांत खानावकर, राम म्हात्रे, संतोष म्हात्रे, राजेश पाटील, जितू काटकर, आनंद सोनवणे, रवींद्र खानावकर, राकेश खानावकर, विनीत खानावकर, धीरज खानावकर, स्वराज खानावकर, राम बुवा खोटारकर, तुषार खानावकर, प्रभाकर खानावकर, तुकाराम खानावकर, महेश म्हात्रे, रोहित उलवेकर, प्रेमनाथ खानावकर, गजानन पाटील, केटी भोईर, दिलीप भोईर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Check Also

पद्मशाली समाजाचा महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना …

Leave a Reply