Breaking News

एपीएमसी मार्केटमधील कामगारांसाठी डोंबिवली-वाशी एनएमएमटी बससेवा सुरू ; आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश

नवी मुंबई : बातमीदार, प्रतिनिधी

वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये काम करणार्‍या परंतु कल्याण डोंबिवली येथे वास्तव्यास असणार्‍या सुमारे 400 कामगारांसाठी सोमवारपासून एनएमएमटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. या कामगारांना पुन्हा कामावर रुजू होता यावे यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी कल्याण-डोंबिवली ते वाशी अशी नवी मुंबई महानगरपालिकेची एनएमएमटी बस सेवा सुरू करण्यासंदर्भात मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्याने बससेवा सोमवारपासून सुरू करण्यात आली.

ही बससेवा सुरू करताना उपाययोजना म्हणून काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. याआधी बसमध्ये 45 बैठे व 15 उभे असे 60 प्रवासी प्रवास करू शकत होते, त्यावेळी डोंबिवली-वाशी प्रवास तिकिटाची किंमत प्रति प्रवासी 80 रुपये अशी होती. परंतु सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याकरिता उभे प्रवाशांना घेता येणार नसल्याने व आता बसमध्ये केवळ 22 प्रवासी प्रवास करू शकल्यामुळे येण्या-जाण्याची तिकिटाची एकूण किंमत 180 रुपये प्रति प्रवासी अशी होते. त्या किमतीत देखील कपात करावी असे प्रशासनास आमदार म्हात्रे यांनी सुचवले होते. त्यामुळे ही रक्कम ही 140 रुपये प्रति प्रवासी अशी करण्यात आली. त्याप्रमाणे पूर्ण महिन्याचस 3640 रुपये आकारले जाणार असून ज्या देखील प्रवाशांनी मासिक पास घेतल्यास त्यांना 2800 रुपये आकारले जाणार आहेत. प्रत्येक प्रवाशास मास्क लावणे बंधनकारक असून वाहनांच्या प्रत्येक फेरीनंतर बसमध्ये सॅनिटाइज फवारणी करण्यात येणार आहे. कोरोनाबाबतच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येणार असून प्रवाशांनीही नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. सद्यस्थितीत 10 गाड्यांच्या फेर्‍या सुरू करण्यात येणार असून मागणीनुसार अधिकच्या गाड्या सुरू करण्यात येणार असल्याचे परिवहन व्यवस्थापनाने सूचित केले. रोजगार नसल्याने हातावर पोट असलेल्या या कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती, त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत होता. एनएमएमटी बससेवा उपलब्ध झाल्याने व्यापारी व कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply