Breaking News

कौशल्य विद्यापीठाला पनवेलमधून सुरुवात होणार -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
जो विकासाचा वादा आम्ही केला तो विकास प्रत्यक्षात आपल्या परिसरामध्ये केला. येणार्‍या काळात अनेक प्रकल्प आपल्याकडे सुरू होणार आहेत. कौशल्य विद्यापीठ महाराष्ट्रभर बनणार असून त्याची सुरुवात पनवेलमधून होणार आहे. त्यामुळे इथल्या तरुणांना रोजगारासाठी आपला भाग सोडून बाहेर जावे लागणार नाही. म्हणूनच आपले मत विकासाला, आपल्या पाठिशी उभ्या राहणार्‍या महायुतीच्या सरकारला द्या, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचारादरम्यान केले.
पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांचा जोरदार प्रचार सुरू असून त्यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी (दि. 31) आरिवली, अजिवली, बोर्ले, भिंगारवाडी, भेरले, भिंगार, शेडुंग, सांगडे, वारदोली, हालटेप, टालटेप, बेलवली या ग्रामीण भागात, तर प्रभाग क्रमांक 19मध्ये प्रचार करण्यात आला. प्रचारावेळी ठिकठिकाणी औक्षण करून त्यांना विजयाचा आशीर्वाद देण्यात आला. दरम्यान, या प्रचारावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षातून सुनील पाटील यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे स्वागत करण्यात आले.
ग्रामीण भागातील प्रचारावेळी भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, दशरथ म्हात्रे, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, शिवकरचे सरपंच आनंद ढवळे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, माजी पं.स. सदस्य रत्नप्रभा घरत, निलेश पाटील, राज पाटील, युवा नेते योगेश लहाने, सुभाष पाटील, आप्पा भागीत, सतिष मालुसरे, शिवाजी दुर्गे, रवी नाईक, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष कमला देशेकर, सरचिटणीस प्रतिभा भोईर, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर तसेच समिना साठी, शिल्पा म्हात्रे, संदेश पाटील, महादेव गडगे, उपसरपंच पूजा पाटील, मच्छिंद्र पाटील, जयदास पाटील, माजी उपसरपंच सूर्यकांत पाटील, निकिता पाटील, शाखा प्रमुख भालचंद्र पाटील, प्रवीण पाटील, बळीराम भोपी, दिनेश पाटील, निलेश भोपी, आदिनाथ पाटील, मंगेश पाटील, पद्माकर म्हात्रे, दत्तात्रेय पाटील, सुबोध पाटील, अंकुश पाटील तसेच प्रभाग क्रमांक 19मधील प्रचारावेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत, संजय जैन, माजी नगरसेवक राजू सोनी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, प्रभाग क्रमांक 19चे अध्यक्ष पवन सोनी, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी पं.स. सदस्य निलेश पाटील, युवा मोर्चाचे देवांशु प्रभाळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
गेली 15 वर्षे तुम्ही मला सातत्याने साथ दिली. त्यामुळे अनेक विकासाची कामे या मतदारसंघात केली. अशाच पद्धतीने आपल्या परिसराचा अखंडित विकास चालू राहावा म्हणून आपल्या सर्वांच्या हक्काचा आमदार म्हणून कमळासमोरील बटन दाबून मला विजयी करा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी केले.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply