Breaking News

खारघर शहरातील सफाई कर्मचार्‍यांना होमिओपॅथिक गोळ्या व मास्कचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल महानगर पालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर व प्रभाग ’अ’ समितीचे सभापती शत्रुघ्न काकडे यांच्या तर्फे     पनवेल महानगर पालिकेच्या खारघर शहरातील सफाई कामगारांना भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने केलेल्या सूचनेप्रमाणे रोग प्रतिकार शक्तीवर्धक अर्सेनिक अलबम 30 गोळ्या व मास्कचे मोफत वाटप करण्यात आले.

बेलपाडा गाव विठ्ठल रखुमाई मंदिरासमोर झालेल्या या कार्यक्रमास प्रभाग समितीचे ‘अ’चे अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, स्वच्छता निरीक्षक जितेंद्र मढवी, संदीप भोईर, स्वच्छता पर्यवेक्षक प्रवीण दूषणीकर, आनंद जाधव, दिनेश राठोड आदी उपस्थित होते.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply