मुंबई : प्रतिनिधी
देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याची मुख्य राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 1 जुलैच्या मध्यरात्रीपासून 15 जुलैला रात्री 12 वाजेपर्यंत ही जमावबंदी लागू असणार आहे. दरम्यान, सकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचार्यांनाच बाहेर पडण्याची परवानगी देण्यात येणार आहे, तर फक्त काही अटी आणि शर्तींवर धार्मिक स्थळांना
या संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाने पत्रकाद्वारे या संदर्भातील माहिती दिली.
यापूर्वी मिशन बिगिन अगेन अंतर्गत सरकारने मोठी सूट दिली होती, परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्यात तसेच प्रामुख्याने मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर पूर्वीप्रमाणे रात्री 9 ते सकाळी 5 यादरम्यान कर्फ्यू लागू असणार आहे. यामधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवांमधील कर्मचार्यांना प्रवासाचीही मुभा असेल.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …