विविध विषयांवर सविस्तर चर्चा
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती क आणि ड यांच्या कार्यालयांमध्ये सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 6) बैठका आयोजित करण्यात आल्या होता. प्रभागांत सफाई कामगार, अतिक्रमण निर्मूलन या विभागांमध्ये अपुरे पडणारे मनुष्यबळ, पाण्याची समस्या तसेच फवारणीसंदर्भातील विषयावर या वेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती क सभापती हेमलता म्हात्रे, प्रभाग समिती ड सभापती सुशिला घरत, प्रभाग समिती ब सभापती समीर ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, अरुणकुमार भगत, अजय बहिरा, विकास घरत, तेजस कांडपिळे, नगरसेविका चारुशीला घरत, वृषाली वाघमारे, रूचिता लोंढे यांच्यासह पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.