Breaking News

कळंबोलीत रस्त्यांच्या कामांना सुरुवात

आमदार प्रशांत ठाकूर यांनी धारेवर धरल्यानंतर सिडकोला जाग; स्थानिक नगरसेवकांच्या पाठपुराव्याला यश

पनवेल : वार्ताहर

कळंबोली वसाहतीतील प्रभाग क्रमांक 7 मधील सेक्टर 14 आणि 15 येथील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. रस्ते खड्ड्यात की खड्डे रस्त्यात अशी परिस्थिती येथे असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान यासंदर्भात स्थानिक नगरसेवक राजेंद्र शर्मा, अमर पाटील, प्रमिला पाटील, विद्या गायकवाड यांनी पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत सिडकोने खड्डे बुजवले सुद्धा, मात्र दोन दिवसात परिस्थिती जैसे थे झाल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी दौरा घेऊन सिडकोला धारेवर धरले. त्यानंतर दोन दिवसातच या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे सुरुवात करण्यात आले आहे.

सेक्टर 14 आणि 15 या परिसरात बीयुडीपी योजनेंतर्गतील घरे आहेत. याठिकाणी लोकवस्ती ही मोठी आहे. समोर 40, 60, 100 आणि 120 मीटरच्या प्लॉटवर रो हाऊस आहेत. दरम्यान गेल्या काही वर्षांपासून येथील अंतर्गत रस्त्यांकडे दुर्लक्ष केले गेले. त्याचबरोबर नालेसफाई ही केवळ वरवर केले जाते. परिणामी पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. जास्त पावसात गुडघ्यापर्यंत पाणी साचून जनजीवन विस्कळीत होते. कायम पाणी रस्त्यावर राहिल्याने ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते.  एकाही रस्त्यांवर डांबर सुद्धा शिल्लक दिसत नव्हते. अक्षरशा चाळण झाल्याने वाहने चालवता अडचणी येत असे. गटारांची झाकणे उघडे असल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर सिडको प्राधिकरणाने या परिसरात ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे अंतर्गत रोडची अवस्था ग्रामीण भागातील रस्त्यांची पेक्षाही बिकट झाली. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. यासंदर्भात स्थानिक नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी वारंवार सिडकोकडे पाठपुरावा केला.

पत्रप्रपंच करून सिडकोच्या अधिकार्‍यांना पाहणी करण्यासाठी पाचारण केले. येथील विदारक स्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याचबरोबर नगरसेविका प्रमिला पाटील, स्थायी  समितीचे माजी सभापती अमर पाटील, भाजपचे कळंबोली मंडल अध्यक्ष रवीनाथ पाटील यांनीही सिडकोच्या संबंधित अधिकार्‍यांना अल्टिमेटम दिले. संबंधित रस्त्यांची झालेली दुरवस्था लक्षात आणून दिली. दरम्यान, सिडकोने या रस्त्यावरील खड्डे सप्टेंबर मध्ये काही प्रमाणात बुजवले. मात्र दोन-तीन दिवसांत परिस्थिती पहिल्यासारखी झाली. काही दिवसांपूर्वी आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोली वसाहतीचा दौरा केला. त्यांनी प्रभाग क्रमांक 7 मधील रस्त्यांच्या समस्यांबाबत सिडको अधिकार्‍यांना जाब विचारला. याबाबत त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी केली. त्यानंतर सेक्टर 14 आणि 15 याठिकाणी रस्त्याचे मजबुतीकरण डांबरीकरणाचे काम प्राधिकरणाने हाती घेतले आहे. त्यामुळे रहिवाशांनी सुद्धा समाधान व्यक्त केले आहे.

प्रभाग क्रमांक सात मधील सेक्टर 14 आणि 15 येथील रस्त्यांबाबत आम्ही स्थानिक नगरसेवक म्हणून सातत्याने पत्रप्रपंच केला. याबाबत सिडकोच्या अधिकार्‍यांच्या भेटी घेतल्या. त्यांना त्या ठिकाणी घेऊन जाऊन प्रत्यक्ष वस्तुस्थिती दाखवली. त्या पार्श्वभूमीवर सिडकोने डागडुजीचे काम हाती घेतले. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी आम्ही सिडकोकडे केली होती. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार पाठपुरावा सुद्धा केला. त्यानुसार मजबुतीकरण आणि डांबरीकरण सुरू झाले आहे.

-राजेंद्र शर्मा, नगरसेवक, पनवेल महापालिका

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply