माणगाव : प्रतिनिधी
भाजपचे माणगाव तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांचा वाढदिवस गुरुवारी (दि. 21) इंदापूर तळाशेत येथे त्यांच्या निवासस्थानी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून ढवळे यांनी आपल्या सहकार्यांसह बोरवाडी येथील माऊली वृद्धाश्रमात जावून तेथील वृद्धा मंडळींना ब्लँकेट, दिनदर्शिका व खाऊचे वाटप केले. संजयआप्पा ढवळे यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते, भाजप महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा शर्मिला सत्वे, शहराध्यक्षा दिपाली जाधव यांच्यासह पक्षाचे अन्य कार्यकर्ते तसेच विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी, ग्रामस्थ व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजयआप्पा यांच्या इंदापूर तळाशेत येथील निवासस्थानी नाचांचे जंगी सामने व गीतमंथन ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमांचा मनमुराद आनंद घेतला.